विक्षनरी:संगणक टंक

विक्षनरी से
Jump to navigation Jump to search

"Marathi Fonts" हा गुगल शोधयंत्रात महाराष्ट्रातील लोकांकडून सर्वाधिक शोधला जाणारा शब्द समुह आहे.या लेखात फॉण्ट (Font) या इंग्लिश शब्दाला मराठीत टंक असा प्रतिशब्द वापरला आहे. संगणकपूर्व काळात टंकलेखन हे टंकलेखनयंत्र वापरुन किंवा खिळे जुळवून केले जात असे. कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने संगणकावर टंकलेखन शक्य झाले.तरी सुद्धा सुरवातीच्या कालावधीत ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउजरच्या तांत्रिक मर्यांदांमुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतीय भाषांचा उपयोग फारच मर्यादित राहिला. यातच संगणकशिक्षित भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर करत. तसेच भारतीय भाषासाठीच्या संगणकीय टंकांकरिता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरू करण्याकरिता करावी लगणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणकीय टंकासोबत बदलणारे कळपाटाचे आराखडे यामुळे पण भारतीय भाषांच्या संगणकीय टंकांचा वापर कमी राहिला आहे.[१],[२]


व्यापारी तत्त्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या मोठ्या आस्थापनांनी संगणकीय टंक भारतीय भाषांत उपलब्ध करून दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याच्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणकीय टंक व भारतीय भाषात ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरुवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसांच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषातील टंक संगणकावर सुलभ पद्धतीने आणि कुठल्याही कार्यक्रमात वापरता येतील असे नव्हते.

खरी क्रांती Windows 98 ही ऑपरेटिंग सिस्टिम मागे पडून व वाढत्या आधुनिक युनिकोड पद्धतीच्या विनामूल्य टंकांमुळे, काही मुक्त तंत्रांश, युनिकोड वापरता येतील अशी संकेतस्थळे इत्यादींमुळे नजरेच्या टप्प्यात आली आहे.

अजूनसुद्धा बहुसंख्य भारतीयांना त्यांच्या स्वत:च्या भाषेतील टंक वापरण्याकरिता किमान काही तांत्रिक संज्ञा माहीत असणे श्रेयस्कर ठरते.

Font व्याख्या आणि विषयाची व्याप्ती[सम्पादन]

चित्र:विकि.jpg
मराठीतील काही टंक नमुने
 • वस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास Font[३] असे म्हणता येईल. यास हिंदी भाषेत 'अक्षरमाला'असाही शब्द प्रचलित होत आहे.

इंग्लिश भाषेत Times New Roman,Arial सारखे Font संगणकावर मुळातच असतात. टंकलेखनापूर्वी ते फक्‍त निवडावे लागतात. बहुसंख्य इंग्लिश भाषेत Font उतरवून घ्यावे लागत नाहीत ना त्यांच्या वापरासाठी मुद्रणाधिकाराचा प्रश्न येतो.

भारतीय भाषांमध्ये सुद्धा आता पुरेसे मोफत टंक internet वर उपलब्ध हो‍ऊ लागले आहेत. आपल्या संगणकावरील ओपरेटिंग सिस्टिम व ब्राउजर कोणता ते पाहून त्यानुसार योग्य टंक संगणकावर download करून घ्यावा. बर्‍याचदा फक्त टंक बसवून पुरत नाही.

 • काही भारतीय टंक लिहिण्या/संपादण्याकरिता विशिष्ट पटलाची (Editor)आवश्यकता असू शकते.
 • विशिष्ट Keyboard layout पण लागू शकतो.
 • या विशिष्ट पटलावर टंकलेखन/संपादन केल्यावर उपलब्ध पटलांवर किंवा प्रणालींमध्ये Copy Paste करण्यापूर्वी विशिष्ट रूपांतरण पद्धतीची गरज पडू शकते.

त्यामुळे भारतीय भाषांचे संगणक टंक फक्‍त टंकच नव्हे तर संबधित टंकाकरिता लागणार्‍या Editor, Keyboard layout, रुपांतरण पद्धती(Transliteration)आणि Help Pages संच स्वरूपात उपलब्ध होणे सोईस्कर ठरते. त्यामुळे भारतीय भाषेतील संगणक टंक हा विषय अधिक व्यापक पातळीवर अभ्यासावा लागतो.

भारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकार[सम्पादन]

 • (हा विभाग व्यवस्थित लिहिण्यास मदत करा)

ढोबळमानाने प्राथमिक स्तरावर मर्यादित उपयोगाचे टंक,वेबपेजवर न उपयोगात आणता येणारे टंक, वेबपेजवर वापरताना Download करावे लागणारे टंक, वेबपेज वरुन आपोआप Download होणारे टंक (Dynamic Fonts), platform-independent युनिकोड टंक इत्यादी आहेत.

काही विकत घेण्याचे संगणक टंक संबधित आस्थापनांच्या मुद्रण अधिकारांमुळे फक्त वाचण्याकरिता वापरता येतात. तसेच संगणक टंकासाठी की बोर्ड लेआउट आणि त्याची वापरण्याची पद्धत वेगळी असू शकते.

तांत्रिक संज्ञा[सम्पादन]

साँचा:Typewin98


 • (ह्या विभागाचे विस्तारीकरण करा)

आपण वापरत असलेल्या संगणकावर कोणती ऑपरेटिंग सिस्टिम कार्यरत आहे हे कसे पहावे?[सम्पादन]

तुमच्या संगणकावर "My Computer" लिहिलेला आयकॉन शोधा व त्यावर माऊसने उजवीकडच्या बटनाने टिचकी मारा. तेथे Properties वर माऊसवर डावीकडे टिचकी मारा,'system' या शीर्षकाखाली तुमच्या संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचे नाव आढळेल.
How can I tell what operating system I am using?
At your desktop:
  • Right click on "My Computer"
  • Left Click on Properties
  • Your operating system will be listed under the System heading

संगणकावरिल संगणक टंक folder कसे उघडावे?[सम्पादन]

  • संगणक टंक कसे install करावेत ?
विंडोजमध्ये डबल क्लिक करून फाँट फाइल पहाता येतात. तुमच्या विंडोज फोल्डरमधील फाँट्स सब्‌डिरेक्टरीत कोणत्याही फाँट फाइलला डबल क्लिक करून दिलेल्या फाँट्चेची अक्षरचिन्हे आणि आकार बघता येतो. तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरवर इन्स्टॉल केलेला प्रत्येक फाँट पेज प्रिंट करून घेऊन फाँट्सचा पोर्ट्फोलीओ बनवू शकता. विंडोजमध्ये फाँट्स ऍड करण्याकरीता फाँट फाइल्स तुमच्या फाँट सबडिरेक्टरीत फक्त कॉपी पेस्ट करा.( सर्वसाधारणता फाँट् फाइल्सना .ttf extension असते.)

विंड्दोजमधील फाँट्स डिरेक्टरीचे उदाहरण

साधारणतः फाँट्स पण संच (फॅमिली) स्वरूपात येतात, समान वळणाच्या फॉण्टच्या गटाला साधारणतः सारखेच नाव असते. ट्रू टाईप फाँट्सना .ttf extensions असतात ती असंख्य आकारात तयार करता येतात.
तुमच्या संगणकाचा वेग टंकाच्या अती सख्येमुळे कमी होऊ नये म्हणून, तसेच नवे टंक यशस्वी रीत्या इनस्टॉल होण्यात अडचणी येऊ नयेत महणून फाँट डिरेक्टरी/सबडिरेक्टरीचा आकार मर्यादित ठेवणे चांगले. तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्कवर इतरत्र स्वतंत्र विस्तृत फाँट डिरेक्टरी/सबडिरेक्टरी ठेवावी व आवश्यकतेनुसार मुख्य फाँट डिरेक्टरीत फाँट कॉपी करावेत आणि नंतर गरज संपली की काढून टाकावेत.
[४]
[५]
संगणक वापरणार्‍याला गरजेनुसार कधीकधी दुसरे वेगळ्या ढंगाचे टंक लागतात. बर्‍याच संगणक प्रणाली त्यांच्या सोईनुसार योग्य ते टंक आपोआप इंन्स्टॉल करत असतात. मॅन्युअली टंक बसवण्याची पद्धत:-

विंडोज ९५/९८/आणि एनटी साठी.

१) स्टार्टवर टिचकी मारा तिथून सेटिंग्ज, नंतर कंट्रोल पॅनेल मध्ये जा.

२) नंतर फाँट चित्रावर टिचकीरून तो फोल्डर उघडा.

३) या फाँट्स फोल्डरमध्ये तुम्ही सर्व नवे जुने इन्स्टॉल केलेले टंक आहेत. नवा फाँट इन्स्टॉल करण्याकरिता फाँट फोल्डरच्या फाइल मेन्यूत जा आणि इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय निवडा.

४)इन्स्टॉल करावयाचे फाँट्स इतर पर्यायी डिरेक्टरीतून निवडा व ओके म्हणा.

 • जर तुमच्या फाइल मेन्यूमध्ये इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय उपलब्ध नसेल तर (संगणकशास्त्राचा परिचय नसलेल्यांनी योग्य तांत्रिक मारगदर्शनाखाली ) फाँट डिरेक्टरी व्यवस्थित 'ऍट्रिब्यूट' केलेली नसण्याची शक्यता गृहीत धरून खालील मार्गदर्शक सूचनांचा वापर करून पहावा.

पहिला पर्याय

अ) तुमचा संगणक स्टार्ट/शटडाऊन/रिस्टार्ट येथे जाऊन MS-DOS पर्यायात चालू करा.Windows ME वापरणार्‍यांना bootable floppy diskette मधून संगणक बूट करावा लागेल.

C:\> येथे खालील आज्ञावली मांडावी.

cd\windows <एंटरकळ टिचकवा>.

attrib -r -a -s -h fonts <एंटरकळ टिचकवा>.

attrib +s fonts <एंटरकळ टिचकवा>.

CTRL + ALT + DEL टिचकवा व संगणक पुन्हा रिस्टार्ट करा.

किंवा हा पर्याय करून पहा

ब) रिपेअर टॅब Tweak UIमध्ये उघडा आणि repair the fonts folder हा पर्याय निवडा.

 • इतर मायक्रोसॉफ्ट वापरकर्त्यांनी (XP)

१) स्टार्टवर टिचकी मारा तिथून सेटिंग्ज, नंतर कंट्रोल पॅनेल मध्ये जा.

२) नंतर फाँट चित्रावर टिचकी/दुहेरी टिचकी मारून तो फोल्डर उघडा.

३) या फाँट्स फोल्डरमध्ये तुमचे सर्व नवे जुने टंक आहेत. नवा फाँट इन्स्टॉल करण्याकरिता फाँट फोल्डरच्या फाइल मेन्यूत जा आणि इन्स्टॉल न्यू फाँट्स हा पर्याय निवडा.

४) इन्स्टॉल करावयाचे असलेले फाँट्स इतर पर्यायी डिरेक्टरीतून निवडा व ओके म्हणा.

संगणक टंक ची जुनी आवृत्ती असेल तर कशी uninstall करावी व केव्हा आणि का ?[सम्पादन]

[६]


मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल आणि इतर संगणक प्रणालीत संगणक टंक कसे निवडावेत?[सम्पादन]

की बोर्ड लेआउट म्हणजे काय?[सम्पादन]

(1) The specification of the physical arrangement of keys on a keyboard and the characters produced when those keys are pressed.
(2) The keyboard layout resource.
Most computers use a keyboard based on the traditional QWERTY typewriter-like keyboard. In the IBM PC and DOS computers, the most common keyboard currently used has 101 keys, with 12 function keys arranged over the top of all the other keys.
Computers and other typing devices offer many different keyboard layouts, for people to be able to input data in different languages. The standard English keyboard layout is known as QWERTY. Various alternatives to the QWERTY layout have been suggested, many claiming advantages such as higher typing speeds. The most famous alternative is the Dvorak Simplified Keyboard.

Keyboard_layout

  • की बोर्ड लेआउट प्रकार १
  • की बोर्ड लेआउट प्रकार २
 • इंटरनेट ब्राउजर म्हणजे काय?
[७]
[८]

इंटरनेट ब्राउजर कोणता आहे हे कसे पहावे?[सम्पादन]

मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत वाचता येऊ शकणारी संकेत स्थळे कोणती?[सम्पादन]

मराठी संकेतस्थळे

फॉंट डाउन लोड करुन नंतर वाचणे म्हणजे काय ? ते कसे करावे?[सम्पादन]

[९]

डायनॅमिक फॉंट टंक म्हणजे काय?[सम्पादन]

युनिकोड compatible फॉंट टंक म्हणजे काय?[सम्पादन]

युनिकोड UTF8 काय आहे तेथे कसे जावे?[सम्पादन]

Can_not_See_Marathi

इंटरनेट ब्राउजर युनिकोड compatible फॉंट [[टंक] कसे पहावे, कसे कार्यवाहीत आणावे?

[१०]

इंटरनेट ब्राउजरचे encoding म्हणजे काय तिथे कसे जावे?[सम्पादन]

कॅरॅक्टर एनकोडिंगइंटरनेटवर भारतीय भाषेतील युनिकोड संगणक टंक वापरून कसे लिहावे?[सम्पादन]

hi:विकिपीडिया:Setting up your browser for Indic scripts

देवनागरी संगणक प्रणाली Font Downloads[सम्पादन]

बराहा[सम्पादन]

बराहा ही भारतीय भाषांत सहजतः लेख लिहीण्या करीता बनवलेली सोपी संगणक लेखन प्रणाली आहे. ही संगणक लेखन प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रीया सुलभतेने करते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे, जसे की विविध दस्तावेज (Word Application),internet आणि Web Pages वर लिहीणे, इ मेल लिहिणे, संगणका वरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वत:च्या मातृभाषेत करु शकतो.बराहायुनिकोड ला सपोर्ट करते.अधिक माहिती साठी बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख वाचावा

Unicode technology मुळे आणि बराहा (roman marathi) मधे लिहिलेला मचकूर direct मराठीत convert होतो ज्याने करुन मराठीत लिहिणे सहज शक्य होते. सर्व प्रथम बराहा software download/install करावे लागेल. त्या नंतर 'बराहा direct' नावाचे software सुरु करावे लागेल. Software सुरु झाले की त्यात खालिल प्रमाणे settings कराव्यात: Indian Language - Hindi-Marathi Activation Keyboard वरील F11किंवा F12 इंग्लिश किंवा मराठी हवे ते एका नंतर एक लिहीता येते. Output Format -internet/webapage वर लिहीण्या करीता Unicode .

   • बाकीच्या editors (Word, Notepad, etc) करीता ANSI निवडा.संबधीत Editor madhye पण बराहा देवनागरी Font निवडा.

Itranslator[सम्पादन]

 • Itranslator हा संगणक टंक #Itrans पेक्षा वेगळा आहे.

सरस्वती[सम्पादन]

युडिट[सम्पादन]

विन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणाली[सम्पादन]

मंगल टंक[सम्पादन]

मंगल (आवृत्ती १.२०) हा युनिकोड आधारित ओपन टाईप देवनागरी फॉंट "ट्रू टाईप आऊटलाइन" सह विंडोज Windows XP, Windows XP SP2 प्रणालींसोबत पुरवला जातो.रघुनाथ जोशी यांनी बनवलेली फॉंट आवृत्ती मायक्रोसॊफ्ट कॉर्पोरेशन तिच्या विंडोज संगणक प्रणालीसोबत वितरीत करते. मंगल फॉंटमध्ये ६७५ ग्लिफ्स आहेत.[१३] अर्थात फॉंटचा उपयोग तुम्ही तो इन्स्टॉल केला आहे का यावर अवलंबून आहे.

मायक्रोसॉफ्ट एक्सपी सोबत पुरवल्या जाणार्‍या इतर टंकाची यादी[सम्पादन]

या बाह्यदुव्यावर आहे.या बाह्यदुव्यावर तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या विविध प्रणालीत पुरवल्या जाणार्‍या सर्व फॉंटची यादी उपलब्ध आहे. त्यापैकी आंतरजालाकरिता खाली दिलेले फॉंट मायक्रोसॉफ्टचा गाभा आहेत.[१४].मायक्रोसॉफ्ट नेहमी विचारले जाणारे प्रश्न या दुव्यावर हाताळते.

 • Andale Mono (formerly Monotype.com),
 • Arial
 • Arial Black
 • Comic Sans MS
 • Courier New
 • Georgia
 • Impact
 • Times New Roman
 • Trebuchet MS
 • Verdana
 • Webdings
 • Adobe Minion Web*

थंडरबर्ड[सम्पादन]

 • 'थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.

वॉशिंग्टन विद्यापीठ कळपाट[सम्पादन]

 • वॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठ]कडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपिंग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करू शकता.

तख़्ती[सम्पादन]

 • देवनागरी लिपीत लिहिण्यासाठी [तख़्ती|तख़्ती] या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येतो.

सुशा शिवाजी[सम्पादन]

आइसिस[सम्पादन]

चंदास आणि उत्‍तरा[सम्पादन]

Chandas font, Uttara font, Chandas Devanagari IME, Chandas Volt project, Uttara Volt project are released under GNU General Public License Chandas - Devanagari Unicode Open Type font (ttf) with the largest ligature set. The font contains 4347 glyphs: 325 half-forms, 960 half-forms context-variations, 2743 ligature signs. It is designed especially for Vedic and Classical Sanskrit but can also be used for Hindi, Nepali and other modern Indian languages. The supplied IME modifies the standard Inscript IME to allow easy input of several characters not (yet) included in the Unicode table, e.g. Vedic accents. The difference between the two fonts is that Uttara has old-style letter and digit forms. The Volt project file makes it possible to edit the OpenType features.

Anglefire संकेतस्थळावर विविध[सम्पादन]

गार्गी,सेतुदेव[सम्पादन]

हरेकृष्णा[सम्पादन]

संस्कृत टंक[सम्पादन]

हिंदी विकिपिडीयाची भलावण[सम्पादन]

हिंदी मोझी अक्षरमाला[सम्पादन]

itrans[सम्पादन]

छहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर [सम्पादन]

इस एडिटर[सम्पादन]

संस्कृत विकिपिडीयाची भलावण[सम्पादन]

देवनागरी[सम्पादन]

अक्षरमाला डाउनलोड (निःशुल्क)[सम्पादन]

अभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावण[सम्पादन]

हर्ष कुमार यांचे शुषा टंक

चित्र:Shusha keyboardplus ss thumb.jpg
शुषा की बोर्ड लेआउट

मुक्त स्रोत टंक[सम्पादन]

आयराइट

युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे[सम्पादन]

मायक्रोसॉफ्टच्या विण्डोजमधून मिळणारा टंक न आवडणार्‍यांसाठी हे पान उपयुक्त आहे.

मर्यादित उपयोगाचे टंक[सम्पादन]

 • फकत संबधित वेबपेजवर अथवा ईमेल लिहिण्याकरिता वापरता येणारे Online संगणक टंक
 • चॅट

अधिक माहिती[सम्पादन]

विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari

इतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंक[सम्पादन]

 • किरण टंक काही संकेतस्थळे हे टंक वापरतात.युनिकोड सपोर्ट नसलेली मोफत संगणक टंक प्रणाली]

फक्त विकत मिळणारे संगणक टंक[सम्पादन]

डाटाफ्लो संकेत स्थळ DTPकरिता लागणारी सर्वात जुनी संगणक प्रणाली आणि सर्व प्रमुख वृत्तपत्रांना टंक प्रणाली पुरवण्याचा दावा करते.


 • सुगम ९८ येथे देवनागरीकरिता मायक्रोसॉफ्ट विंडोज९८ वर चालणारे युनिकोड टंक आहेत असे यांचे संकेतस्थळ सांगते.
 • सि डॅक चे लिप टंक हे टंक श्रीलिपी पेक्षा नवीन आहेत. आत्तापर्यंत उपलब्ध माहितीनुसार ते युनिकोड सपोर्ट करत नाहीत.

संबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्द[सम्पादन]

मराठी भाषा युनिकोड Dingbat,Glyph,Font face,Mapping of Unicode characters UTF8 Windows ANSI code page

शह आणि मात[सम्पादन]

 • संगणक टंक वापरताना येणार्‍या अडचणींचे स्वरुप:
  • तांत्रिक संज्ञांची माहिती आणि पारिभाषिक शब्द
  • वापर सुरु करण्या करिता करावि लगणारी क्लिष्ट प्रक्रिया,
  • प्रमाणिकरणाचा अभाव: दर संगणक टंका सोबत बदलणारे किबोर्ड ले आउट्स
  • रुपांतरणातील मर्‍यादा
  • Embeded Dynamic,Unicode,Minglish
  • लिखीत मजकुर सुबक वाचनीय स्वरुपात वेगाने मांडण्याचे काम टंक लेखन करते.हाताने लिहीलेल्या मजकुराला हस्त लिखित,Type केलेल्या मजकुरास टंकलिखीत आणो छापील मजकुरास मुद्रीत असे म्हणण्याचा प्रघात आहे.त्याप्रमाणेच कदाचित संगणकावर लिहीलेल्या मजकुरास संगणक लिखीत असे म्हणता येइल का या बद्दलचे व संबधित पारिभाषिक शब्दांबद्दलचे आपले मत चर्चा पानावर मांडावे.
 • वेब पेज वरील शब्दचित्रे आणि colour loss

हे सुद्धा पहा[सम्पादन]

बाह्य दुवे[सम्पादन]

वर्ग:विकिपीडिया संपादन वर्ग:संगणकशास्त्र वर्ग:मराठी टंकलेखन प्रणाली वर्ग:अपूर्ण लेख दुव्याचे शीर्षक